मंगळवेढा जिल्हा दैनिक शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पोपट इंगोले तर उपाध्यक्षपदी बिराप्पा करे याची निवड...

मंगळवेढा जिल्हा दैनिक शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पोपट इंगोले तर उपाध्यक्षपदी बिराप्पा करे याची निवड...

मंगळवेढा/प्रतिनिधी

               मंगळवेढा जिल्हा दैनिक ग्रामीण व शहर पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 6 जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून म साजरा केला जातो. जांभेकर  यांच्या  प्रति

मेचे पूजन प्रा सचिन इंगळे व संभाजी नागणे यांच्या हस्ते करण्यात आले  पत्रकार दिनाचे औचित्य साधत शासनमान्य मंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या निवडी संस्थापक अध्यक्ष संतोष मोरे,सल्लागार शिवाजी पुजारी सचिन इंगळे,संभाजी नागणे, दत्तात्रेय नवत्रे,मल्लिकार्जुन देशमुखे,हुकूम मुलाणी,गुरुदेव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आल्या मंगळवेढा जिल्हा दैनिक शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै.माणदेश नगरीचे मंगळवेढा तालुका प्रतिनिधी पोपट इंगोले व उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे बिराप्पा करे, सचिवपदी दैनिक पंढरी भुषणचे संदीप लिगाडे,खजिनदारपदी दैनिक पुण्यनगरीचे अहमद शेख व कार्याध्यक्षपदी हॅलो महाराष्ट्र न्यूजचे  सचिन निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाल,श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी मंगळवेढा जिल्हा दैनिक शहर व ग्रामीण पत्रकार संघातील सर्व सदस्य   उपस्थित होते